मुलीच्या लग्नासाठी स्थळं यायला लागली कि घरात 'यंदा
कर्तव्य आहे' च सत्र चालू होत. फारच वेगळा काळ असतो हा,
मुलीच्या
आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणणारा. प्रत्येकीचं आयुष्य लग्नानंतर सुखी होईल याची
खात्री कुणीच देऊ शकत नाही, पण तिच्या आयुष्याची आपल्यामुळे फरपट
होऊ नये याची काळजी मात्र प्रत्येकाने घ्यावी.
मुलीच लग्न ठरवताना तीच मत विचारात घ्या,
जर
ते मत तुम्हाला पटत नाही तर त्यावर चर्चा करून काहीतरी तोडगा काढा. पण तीच मत पटत
नई म्हणून तुमची मत तिच्यावर लादू नका. काही वेळा मुलीच्या काही अपेक्षा असतात
शिक्षणाबाबत, नोकरीबाबत, पण ते काही
विचारात न घेता लग्न ठरवलं जात. अशा वेळी लग्न म्हणजे फक्त तडजोड हीच भावना
मुलीच्या मनात राहते. आई-बाबांच्या भावना दुखावल्या जाऊ नये म्हणून, किंवा
इतर काही कारणांमुळे हे असं सारं समाजात घडत असत.
लग्न ठरायचा या काळात घरात बरेचदा वादविवाद
होतात, मतभेद होतात. काही वेळा या साऱ्याला ती मुलगीच जबाबदार आहे असं ठरवलं
जात. हे सारं मला समजण्यापलीकडच आहे. सरकारने जरी लग्नासाठी मुला-मुलीच वय निश्चित
केलं असलं तरी काही वेळेस, स्थळ चांगल आहे असं म्हणून कमी
वयात मुलीच लग्न लावलं जात, याचा
त्या मुलीच्या आयुष्यावर, तिच्या आरोग्यावर काय परिणाम होईल याचा
विचार केला जात नाही.
एखाद्या मुलीच लग्न ठरत नसेल तर, किंवा
तिला हवा तसा जोडीदार मिळत नसेल तर तीच भेटेल त्याच्याशी लग्न लावायची तयारी असते
काही घरात. का तर, मुलीच वय वाढलं तर तीच लग्न कस ठरेल, समाज
काय म्हणेल, आपण अजून किती दिवस तिची जबाबदारी घायची,
या
अशा विचारांमुळे.
मुलीच शिक्षण जर जास्त असेल आणि ती आपल्या शिक्षणानुसार मुलाची निवड करू
इच्छिते तर त्यात गैर काय आहे? पुरुषी अहंकार सगळ्यांनाच माहितेय, सगळेच पुरुष
स्त्री ला समजून घेतील असं नाही. आजही अनेक घरात स्त्रीच्या मताला काडीचाही मान
नसतो. शिक्षण हे लग्नानंतर होणाऱ्या वादाला कारण ठरू शकत.
म्हणूनच सांगतेय, जर मुलीच लग्न
ठरवताय तर तीच मत, तिच्या इच्छा-अपेक्षा, तीच शिक्षण
सारंच काही लक्षात ठेवून पुढचे निर्णय घ्या. कारण याच निर्णयावर दोन उभयतांच भविष्य अवलंबून असत. फक्त आई-वडिलांनीच मुलीचा विचार करावा अस नाही, मुलीनेही
त्यांच्या मताचा, त्यांच्या अनुभवाचा विचार करावा.
No comments:
Post a Comment