"मैत्री"
'मैत्री' म्हणजे काय??
पहिली ओळख एका अनोळखीची,
मग बनते सोबत हक्काची,
एक साद मिळते आपुलकीची,
आणि जाणिव होते अटुट विश्वासाची,
जी साथ देते कायमची.
पहिली ओळख एका अनोळखीची,
मग बनते सोबत हक्काची,
एक साद मिळते आपुलकीची,
आणि जाणिव होते अटुट विश्वासाची,
जी साथ देते कायमची.
'मैत्री' किनारा नसलेला, अनंत हिरे माणकांची चमक असलेला, अंत नसलेल्या सौंदर्याचा एक महासागरच आहे. पाहायला गेल तर 'मैत्री' हा एक दोन अक्षरी शब्द आहे, वाचायला फारच सोपा आहे ना!! पण या शब्दाचा अर्थ साांगता येणं फार कठीण आहे. फक्त शाळेत किंवा आपल्या सुखदुःखात सोबत हवी म्हणुन केलि जाते ती 'मैत्री' असते का? गरजेपुरती वापरता येते ती 'मैत्री' असते का? अडचणीच्या संकटाच्या वेळी साथ व्हावी म्हणुन केलि जाते ती 'मैत्री' असते का?
खर तर 'मैत्री' हे एक अस नातं आहे जे रक्ताच्या नात्याप्रमाणेच किंवा काही वेळा त्यापेक्षाही फार मोलाचं आहे. 'मैत्री' म्हणजे काय हे कदाचित मलाही पुर्णत: माहित नसावं. पण माझ्यामते तरी हे एक अस जिव्हाळ्याच नातं आहे ज्याला कुठेही अंत नाही. जन्माला आल्यापासुन अगदी मरेपर्यंत कुणीही, कुणाशीही 'मैत्री' करावी. मग ती कितीही जणांबरोबर असू शकते. 'मैत्री' करायला जगातल्या कुठल्याही पोथीपुरणात किंवा कुठल्याही कायद्यात मर्यादा नाही दिलेली. अर्थात् असंख्य माणसांबरोबर आपण 'मैत्री' करू शकतो.
'मैत्री' ही मधाच्या मधुरतेपेक्षाही फार मधुर असते जी वर्षानुवर्षे टिकून राहते, हिरमाणकांपेक्षाही अधिक चमकदार असते जी आजन्म चमकत राहते, प्राणापेक्षाही प्यारी असते जिच्यासमोर आपल्या प्राणाची किंमतच शुन्य असते. 'मैत्री' हा एक मोती आहे जो हृदयाच्या शिंपल्यात जन्म घेतो आणि आपल्या जीवनाचे सौंदर्य वाढवतो. 'मैत्री' ही शाहळ्याप्रमाणे दिसायला कठीण, मात्र आतमधे मधुरस दडलेला असतो जो चाखल्यावर त्याची गोडी कळते.
'मैत्री' ही मधाच्या मधुरतेपेक्षाही फार मधुर असते जी वर्षानुवर्षे टिकून राहते, हिरमाणकांपेक्षाही अधिक चमकदार असते जी आजन्म चमकत राहते, प्राणापेक्षाही प्यारी असते जिच्यासमोर आपल्या प्राणाची किंमतच शुन्य असते. 'मैत्री' हा एक मोती आहे जो हृदयाच्या शिंपल्यात जन्म घेतो आणि आपल्या जीवनाचे सौंदर्य वाढवतो. 'मैत्री' ही शाहळ्याप्रमाणे दिसायला कठीण, मात्र आतमधे मधुरस दडलेला असतो जो चाखल्यावर त्याची गोडी कळते.
"friendship is a gift you give yourself"
'मैत्री' जीवनाला एक नव वळण देते, आपल्या जीवनात स्वतःच एक नव विश्व तयार करते.
"A new friendship is like,
an unripened fruit, it may
become either an orange or a lemon."
ही गोष्ट सत्यच आहे की नवी 'मैत्री' फार नाजुक असते, तिची योग्य ती जपणुक नाही केली तर ती आपल्या आयुष्यात कायमची कटुता निर्माण करू शकते.
आपल्या 'मैत्री'तला महत्वपुर्ण भाग म्हणजे,
"Friend is that person who behaves as a father, mother, sister, brother when necessary"
आपल्या सुखात आपली साथ पुरावणारा आणि दुःखात आपल्यासोबत खंबीरपणे उभं राहून मार्ग काढणारा आपला मित्रपरिवारच तर असतो.
"Your friend is the man who knows all about you and still likes you"
आपला मित्रपरिवार हा 'मैत्री'चा एक मौल्यवान भाग असतो की ज्याच्याशिवाय 'मैत्री'च काही अस्तित्वच नाही.
संकटाच्या वादळात मदतीचा हात पुढे करणारा, चुकांच्या महापुरात समजुतीच्या नावेत आपल्याला स्वार करुन सुखरूप स्थळी पोहचवणारा, नैराश्याच्या भूकंपात धीर देणारा, असफलतेच्या अंधारात प्रकाशाची ज्योत पेटवणारा, प्रत्येक खडतर परीक्षेत शुभकामनांचा वर्षाव करणारा आपला मित्रपरिवारच असतो. आपल्या आयुष्यातील काही गोष्टी आपण आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर वाटून घेतो.
सोबत नसतानाही असल्याची फ़क्त जाणीवाही आपल्या 'मैत्री'ला घट्ट बनवते. आपल्याला पुर्णपणे बदलण्याची, योग्य वाटचालीवर चालवण्याची क्षमता असते 'मैत्री'त.
विश्वास हे एक अस शस्त्र आहे जे 'मैत्री'तील कितीही मोठा अडथळा दूर करू शकते. परंतु हेच दुधारी शस्त्र एका अटूट 'मैत्री'ला नष्ट करू शकते.
"In true friendship,
trust is a powerful thing,
that must not be broken by any friend."
जेव्हा 'मैत्री'त विश्वासाला ईजा पोहोचते तेव्हा त्या 'मैत्री'च काही अस्तित्वच उरत नाही. एकदा तुटलेला विश्वास 'मैत्री'सारख्या एक मजबुत नात्याला कायमच तोडू शकतो. त्यामुळे 'मैत्री'त कधीही एकमेकांचा विश्वास तोडू नये.
'मैत्री' ही ईश्वराने आपणा सर्वाना दिलेली एक देणगी आहे जी आपण आपल्या आयुष्यात निस्वार्थी भावनेने जपली पाहिजे."

No comments:
Post a Comment